Saturday, November 12, 2011

हे काय?

काही कळेनासे झालंय.
इतका कशाचं वाईट वाटतं हे हुडकैला निघाले.
इतकी आतल्या आत घुसमट इतक्या वेदना... सगळ्यांनी मला रिते रिते वाटत जात होते आणि त्याच बरोबर ओसुंडून आलेल्या नाभाप्रमाणे वाटत होते...

मी खूप विचार केला... इतके का अश्रू येतात? इतकं कसले वाईट वाटते?
तो आज आहे आणि कदाचित उद्या नसणार हे आधीपासूनच माहित नव्हते का?! पण मग ह्या सत्याची आत्तापासून का मला सल जाणवते?
मला वाटते कि मी हरले. इतकं प्रेम देऊन हि स्वतःसाठी काही घेता आले नाही.
पण प्रेमात तर हरणे जिंकणं नसतच!  देता येते तेवढे देत राहीचे असते... कशाची अपेक्षा न बाळगता.

आणि आज हेच प्रेम अश्रूंबरोबर वाहून जावे असे वतात होते.
कल्याकुत्ता ढगात.



Thursday, January 20, 2011

शोकसभा

वारा गुदमरून गुदमरून विरून गेला.
दुखाचेही डोह अटत गेले.
स्वप्न भंग भंग होत उत्पत्तिच विसरले.
उरला तो फ़क्त अन्धकार.
अंधार.

'हा क्षण' 'तो क्षण' म्हणता म्हणता क्षण ही उरला नाही. 

रितेपण म्हणावे तसे उरले नव्हते.
सारेच थोड़े- थोड़े होते. पूर्ण नाहीच.
श्वास मात्र चालू होता. अखंड.

सारेच होते अन नव्हते ही!
मी पण तिथे होते. अश्रु रूपी दुख अनुभवत होते.
पण मी दुखी नव्हते.

जाणारा जातो. असनारा शोक करतो.
अणि माझ्या सारखा कोर्दा पाषाण...
'स्थित्प्रद्न्य' असण्याचा आव आणत खाम्बिरता वठव तो   .
 कशासाठी? 
कदाचित स्वतःपसुन पलन्या  साठी  ...
  
  

विहीर -II

विहीर. पाणी पाणी होण्यासाठी ... खोल खोल जाण्यासाठी.
तीच विहीर. कधी तहान भगव न्यासाठी. तर कधी एखादी दुबकी मारण्यासाठी.
त्याच विहिरीत जीव ही जातो. त्याच विहिरीनी जीवही वाचतो.
शेत ही तिच्यावर. अणि माणूस ही . गुरे पण तिचीच अणि मातिही.
तीच विहीर कधी भांड ईला , तर कधी प्रेम कर ईला .

मी लपले होते एकदा. तिच्यात. तिच्यापसुनच.
गार गार पाण्यात पाय बुडवून. थंडा वारा अंगावर घेत. गप्पी मासे पायाशी खेळत.
त्यादिवशी विहीर समजली. अन उमजलिही.
एक 'विहिरीच्या' पलिकडे.