Friday, December 10, 2010

विहीर

काहीतरी आहे जे मला खुणावत आहे. प्रत्येक पावली, प्रत्येक क्षणी. आत दडलेला एक आवाज. खोल ओढून नेणारा. अणि तोच, उंचीवर नेउन ठेवणारा.
काहीतरी, कोणीतरी जीवाच्या आकांताने साद ग़लत आहे असे वाटते. आत बंधिस्ता असलेल्या काहीतरी व कोनिलातरी सोद्वावे अशी सतत ची विनंती.
के आहे हे नेमके?
तो आवाज सृजन शिलतेचा ? की माझ्या कित्येक दिवस हातात न घेतलेल्या कुंचल्याचा?  माझ्या रंग-रेशांची तकाद च गवसणी घालत असावी का?
विहिरीत ओरडून मन मोकले करावे असा काहीसा प्रकार. पाण्याचा तरंगावर ध्वनी हलकेच पाय टेकवून आल्या पावली परत मागे फिरणार...'प्रतिध्वनी' होउन. दगडाचे कान, आपलीच श्र वणशक्ति. जून जून जाणार कुठे? परत येणार आपल्याच कड़े... पिंगा घाल इला.
आज माझा आतला आवाज असाच काहीसे म्हणतोय. ओलावा हरवत चाललेली मी, माझ्यातील जगु पाहणारी प्रतिभा , माझ्या मेंदूचे ह्रुधय (heart ) व जनिवान वरील नियंत्रण... हे सर्व ह्या सगलयाचे साक्षी.
उर फुटून माझी कला एकदाची बाहेर काढून संपवून टाकावी! रोजच्या यांत्रिक जीवनात नकोच तिचे सुरिले स्वप्न! मश्जिद्च नसेल तर फकीर कुठला जातोय तिथे?!
पण कलेच  हे अगदी जीवन-मरण सारखे आहे. 'ये' म्हणून येत नाही अणि 'जा' म्हणून जात नाही... पण आयुष्यभर काहीतरी भुंगा ला उन  आपल्याला नेत जाते. ज्याला अपन 'धेय' 'लक्ष्य' वगरे अवजड शब्दत कोंड्तो न, तिथे!
ही मनाची बंद कवडे आता उघड  इला  हवीत. अलसाची अणि निरुत्सहाची पुटे झाडून आता रंगत न्हाय्ची वेळ येउन ठेपली आहे... अटला आवाज ओलखुन त्याला प्रतिसाद देण्याची वेळ. अगदी पूर्ण अंतकरनानी!