शेवटी हस्ताक्षर केले : दुर्गा, पिट्सबर्ग आणि आजची तारीख.
निळ्या रंगात ती पांढरी अक्षरे उठून दिसत होती. आणि त्यापेक्षाही उठून दिसत होते माझे 'मी 'पण .
गेले काही वर्ष हे पैंटिंग मी अर्धवट गुंडाळून ठेवले होते.
त्यातले आर्त भाव कमी झाले होते असे नाही, पण अधूनमधून डोकावणारा न्यूनगंड आणि इतर कामांना दिलेले प्राध्यान...
एकदाच्या माझ्या पंच कन्या कॅनवास वर अवतरल्या!
ह्या पंच महाभूतांच्या माध्यमातून प्रत्येक शक्तीची स्वाभाविक रूपे ह्या रचनेत आहेत. माझ्या डोळ्याला दिसणाऱ्या ह्या पाच शक्ती नारीस्वरूप आहेत. एकमेकांत गुंतलेल्या नसल्या तरीही एकमेकींवर विसंबून आहेत. पाण्याची खोलाई जशी पृथ्वी च्या भुपटवरच्या खाचखळग्यांवर ठरते, तसे अवकाश आपल्याला तेजाच्या साहाय्याने अनुभवता येते, व हे तेज वायू मुळेच आपल्यापर्यंत पोहोचते... एकाच मूलगर्भातून निर्माण होणाऱ्या ह्या पाच शक्ती परत तिथेच विलीन होतील अशीही कल्पना आहे. धरतीच्या बरोबरीला हात आहेत, जणू असे की पृथ्वी आपल्याला बाकी चार शक्तींचे आकलन करण्यास सहाय्य करते.
मध्ये मध्ये सुक्ष्म मानव प्रत्येक शक्तीच्या अवती भवती आहेत, ते आपणच! शक्तीला कवेत घेण्याच्या प्रयत्नात!

![]() |
| पृथ्वी |
![]() |
| पृथ्वी वरची सृष्टी |
![]() |
| वायू |
![]() |
| वायू आणि अग्नी - मागे आठ चक्र (ऊर्जेचे स्रोत ) |
![]() |
| अवकाश (त्यात काही नक्षत्रे ) |
![]() |
| जल |
![]() |
| एकाच मूलागर्भातून येणारी ही पाच तत्त्वे - त्यांचे आपसाथचे अनुसंधान (आयुष्याचे पुर्ण वर्तुळच जणू ) |